Wednesday, 18 September 2024

मालिका- वादळवाट : स्वर - देवकी पंडित, स्वप्‍नील बांदोडकर

 

वादळवाट 

थोडी सागर निळाई, थोडे शंख नि शिंपले 

कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यांत वाचले 

कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात 

स्वप्‍नपाखरांचा थवा विसावला ओंजळीत 


कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट 

हुंकारला नदीकाठ, कधी हरवली वाट 

वार्‍यापावसाची गाज, काळे भास गच्च-दाट 

कधी धूसर धूसर एक वादळाची वाट ! 


गीत - मंगेश कुळकर्णी 

संगीत - अशोक पत्की  

गीत प्रकार - मालिका गीत 

मालिका- वादळवाट 

वाहिनी- झी मराठी

स्वागत सुंदर गाण्यांच्या विश्वात

सुंदर गाणी या ब्लॉग वर सुंदर गाणी आणि सुंदर कविता यांचे संकलन असेन 

मालिका- वादळवाट : स्वर - देवकी पंडित, स्वप्‍नील बांदोडकर

  वादळवाट  थोडी सागर निळाई, थोडे शंख नि शिंपले  कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यांत वाचले  कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात  स्वप्‍नपाखरांच...